PostImage

pramod abhiman raut

Jan. 7, 2024   

PostImage

Woman killed in tiger attack ; वाघाच्या हल्ल्यात महीला ठार


चिमूर प्रतिनिधी :-

         सकाळच्या सुमारास शेतात काम करीतअ सताना अचानकपणे वाघाने हल्ला करून एका 50 वर्षीय महिलेला ठार केल्याची घटना 7 जानेवारी रोजी अहेरी तालुक्यात घडली आहे. सुषमा देवदास मंडल रा. चिंतलपेठ ता. अहेरी, असे महिलेचे नाव असल्याचे कळते. घटनेच्या दिवशी सदर महिला शेतात कापूस वेचणी करताना अचानकपणे वाघाने तिच्यावर हल्ल करून ठार केले आहे. सदर घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले असून महिलेच्या परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. घटनेची माहिती मिळताच अहेरी वनपरिक्षेत्र अधिकारी आरती मडावी यांनी टिमसह घटनास्थळ गाठला.

         मुलचेरा तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वाघाने दहशत माजवली असून पाळीव जनावरांवर हल्ले चढवत असल्याचे बोलले जात आहे. नुकतेच काही दिवसापूर्वी कोठारी ते कोपर अल्ली रस्त्यावरील मल्लेरा जवळ काही लोकांना वाघाचे दर्शन झाले होते. आता चिंतलपेठ येथे वाघाने महिलेला ठार केल्याची घटना समोर आली असून वनविभागाने या वाघाचा त्वरित बंदोबस्त


PostImage

pramod abhiman raut

Dec. 30, 2023   

PostImage

Taiger Attack ; वाघाच्या हल्ल्यात शेतमजूर ठार...


 

चिमूर प्रतिनिधी :-

     वाघाच्या हल्ल्यात शेतमजूर ठार झाल्याची घटना (दि.२९) सकाळी जिल्ह्यातील मूल तालुक्यात उघकीस आली. जानाळापासून जवळच असलेल्या फुलझरी परिसरात त्याचा मृतदेह आढळून आला. सुभाष लिंगाजी कडपे (वय ४२) असे या शेतमजुराचे नाव आहे. तो जानाळा येथील रहिवासी होता.

       सुभाष कडपे हे जंगलालगत असलेल्या शेतात जनावरांसाठी चारा आणण्यासाठी गेले होते. त्याठिकाणी दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला करून त्यांना ठार केले. त्यानंतर त्यांना फुलझरीच्या दिशेने ओढत नेले. सुभाष हे घरी आले नसल्याने घराच्यांनी शोध सुरू केला. आज सकाळी सातच्या सुमारास फुलझरी परिसरात त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर बफर झोनचे वनपरिक्षेत्राधिकारी राहूल कारेकर, क्षेत्रसहायक औमकार थेरे, व पोलिस निरिक्षक सुमित परतेकी यांनी घटनास्थळी भेट दिली. पंचनामा झाल्यानंतर सुभाष यांचा मृतदेह मूल येथील उपजिल्हा रूग्णालयात शेवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. वनविभागाने सुभाषच्या कुटुंबियांना तातडीने तीस हजार रूपयांची मदत केली आहे. मूल तालुक्यात वाघांचे हल्ले वाढले आहेत. त्यामुळे वनविभागाने वाघांच्या बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

 

 

 

(संग्रहित छायाचित्र)


PostImage

pramod abhiman raut

Nov. 25, 2023   

PostImage

Taiger Attack ; शेतात धानाचा सरवा वेचायला जाणाऱ्या महिलेला वाघाने …


 

चिमूर प्रतिनिधी :-

       धान बांधणीनंतर शेतातील शिल्लक लोंबी (सरवा) वेचण्यासाठी जाणाऱ्या महिलेवर वाघाने हल्ला करून तिला ठार केले. ही घटना शुक्रवार २४ नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास हिरापूर येथील कंपार्टमेंट नं. १६६ मधील शेतशिवारात घडली. इंदिराबाई उमाजी खेडेकर (५५) रा. हिरापूर असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे.

           इंदिराबाई खेडेकर या आपल्या शेतातील धानाच्या लोंबी (सरवा) वेचण्यासाठी पाथरगोटा भागातील शेतात हिरापूर-शिवणी मार्गाने जात होत्या. परंतु याच वेळी रस्त्यालगतच्या झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने इंदिराबाईवर हल्ला करून त्यांना झुडपात फरफटत नेले. सायंकाळ होऊनही इंदिराबाई घरी परतल्या नाहीत. त्यामुळे त्यांचा शोध घेण्यासाठी कुटुंबीयांनी शेताच्या दिशेने धाव घेतली व शोध सुरू केला. तेव्हा सायंकाळी सात वाजताच्या सुमारास इंदिराबाई यांचा मृतदेह पाथरगोट्याजवळ आढळला. त्यानंतर घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. वनाधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व इंदिराबाईंचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, सुना, नातवंड आहेत.

           धोका पत्करून शेतीची कामे केली जात आहेत. हिरापूर परिसरात चार ते पाच वाघांचा वावर असल्याचं सांगितलं जातेय. याच भागात अनेकांची शेती आहे. सध्या धान कापणी, बांधणी व मळणीची कामे सुरू आहेत. त्यामुळे वाघाच्या दहशतीत धोका पत्करून शेतीची कामे करावी लागत आहेत.


PostImage

pramod abhiman raut

Nov. 21, 2023   

PostImage

Taiger Attac ; मंदिरात पूजा करण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला वाघाने केलं …


Taiger Attac ; मंदिरात पूजा करण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला वाघाने केलं ठार

चिमूर प्रतिनिधी :-

       चंद्रपूर जिल्हा हा वाघांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. येथे मानव-वन्यजीव संघर्ष शिगेला पोचला आहे. मात्र कधी नव्हे ते आता वाघांनी चंद्रपूर शहराच्या दिशेने कूच केली आहे. चंद्रपूर शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या शनी मंदिरात, एक व्यक्ती पुजा करण्यासाठी गेला असता त्यावर वाघाने हल्ला करून ठार केलं आहे. मनोहर वाणी (वय 53) असं मृतकाचे नाव आहे.
        चंद्रपूर शहराच्या बाबूपेठ वस्तीला लागून जुनोना जंगल सुरू होते. याच परिसरात शनी मंदिर आहे. मृतक मनोहर वाणी येथील मंदिरात दररोज पूजा करण्यासाठी जातात. आज सकाळी ते पूजा करण्यासाठी गेले असता त्याचवेळी दबा धरून बसलेल्या वाघाने मनोहर यांच्यावर हल्ला केला. वाघाने मृत झालेल्या वाणी यांना शनी मंदिरापासून तब्बल 300 ते 400 मीटर अंतरापर्यंत फरफटत नेलं. मनोहर वाणी यांचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच वनविभागाला सदर घटनेची माहिती देत मृतकाच्या कुटुंबाला 25 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली. मनोहर हे घरचे कर्ते पुरुष होते, घरची आर्थिक परिस्थिती बिकट असून त्यांना दोन मुली आहेत. वनविभागाने वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.


PostImage

pramod abhiman raut

Oct. 30, 2023   

PostImage

Taiger Attac ; वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार ; चंद्रपूर जिल्हयातील …


 

चिमूर प्रतिनिधी :-

       तालुक्यापासून 30 किलोमीटर असलेल्या अंतरावर बेंबळा गावातील शेतकरी सूर्यभान हजारे (वय अंदाजे ७० वर्ष) शेतात बैल चारत असताना वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्याची चंद्रपूर जिल्ह्यात चोवीस तासात दूसरी घटना घडली आहे.
        खडसंगी वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या कक्ष क्रमांक 59 लगत बफर झोन जंगल असलेल्या शेत शिवारात बैल चारत असताना अचानकपणे वाघाने हमला करत ठार केले. चंद्रपूर जिल्ह्यातील २४ तासातील हि दूसरी घटना घडली आहे. नवेगाव (रामदेगी) बफर झोन क्षेत्रात सध्या भानुसखिंडी तिचे बच्चे अन् मटकासूर, बबली असे वाघांचे पर्यटकांना दर्शन होत असते. शेतकऱ्याला ठार करणारा वाघ हा भानुसखिंडीचा बच्चा असल्याचे सूत्राकडून माहिती मिळाली आहे. या बच्चानी पहिल्यांदाच शेतकऱ्यांची शिकार केली असल्याचेही सांगीतले जातेय. काल पळसगाव वनपरिक्षेत्रा अंतर्गत विहीरगाव येथील एका गुरख्याला वाघाने ठार केले होते. हि घटना ताजी असतानाच आज खड संगी वन परिक्षेत्र अंतर्गत बेंबळा येथील शेतकरी सूर्यभान हजारे यांच्यावर हल्ला करून ठार केल्याची घटना घडली आहे.
        सदर घटनेची माहिती परिसरात पसरताच मोठ्या प्रमाणात नागरिकांनी पाहण्यासाठी गर्दी केली असून वन विभागाची टिम घटनास्थळी दाखल झाले आहे. समोरील घटनेचा पंचनामा चौकशी बफर झोनचे वनपरिक्षेत्र अधिकारी किरण धानकुटे यांच्या मार्गदर्शनात केले जात आहे.
@@@@@@@@@@@@@@@@@

    यावेळी नागरिकानी मागणी रेटून धरली असल्यामुळं दिड लाख रुपये कॅश व १० लाख रुपयांचा चेक बफर झोनचे उपसंचालक कुशाग्र पाठक यांच्या हस्ते कुटुंबीयांना देण्यात आला. असल्याची माहिती वन परिक्षेत्र अधिकारी किरण धनकुटे यांनी सांगितले 


PostImage

pramod abhiman raut

Oct. 23, 2023   

PostImage

Taigar Attac ; आंबोली येथे वाघाच्या हल्ल्यात बैल ठार


 

शेतकऱ्याचे ऐन हंगामात नुकसान

चिमूर प्रतिनिधी :-

        चिमूर तालुक्यातील आंबोली येथील पांडुरंग कवडू ठाकरे यांच्या गावालगत असलेल्या शेतातील गोठ्यात 22 ऑक्टोबरच्या रात्री वाघ शिरला व गोठ्यात बांधून असलेल्या बैलावर वाघाने हल्ला केला. त्यात बैल ठार झाला. वाघाने बैलाचे बरेच मांस खाल्ले व निघून गेला. 23 ऑक्टोबरला सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास पांडुरंग ठाकरे शेतात गेल्यावर ही घटना उघडकीस आली.
       भिसी उपवन क्षेत्राचे वनरक्षक भानुदास बोरकर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. वाघाने पाळीव जनावरांना ठार केल्याची एका महिन्यातील ही तिसरी घटना आहे. त्यामुळे आंबोली परिसरातील शेतकऱ्यांमध्ये वाघाची दहशत निर्माण झाली आहे. पांडुरंग ठाकरे यांचा पन्नास हजार रु. किमतीचा बैल ऐन हंगामात वाघाने मारला. त्यामुळे वन विभागाने तत्काळ पांडुरंग ठाकरे यांना नुकसान भरपाई द्यावी व वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी आंबोली येथील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत मोरे यांनी केली आहे.